॥ शुभ वास्तु • समृद्ध जीवन • मंगल दिशा ॥
वास्तुशास्त्र समाधान

विवाह आणि नातेसंबंध

विवाह आणि नातेसंबंधासाठी - वास्तुशास्त्र समाधान

विवाह आणि नातेसंबंध

विवाह

आम्ही लग्नाशी संबंधित विशिष्ट समस्या असलेल्या बर्‍याच ग्राहकांसोबत काम केले आहे. बर्‍याच पालकांना विशेषत: त्यांच्या धाकट्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न वेळेवर होण्याविषयी काळजी असते.

वास्तूने बर्‍याच लोकांना लवकरच चांगला जोडीदार लवकर शोधण्यात मदत केली आहे. वास्तूच्या व्यवस्थेत काही बदल करून चांगले परिणाम बघायला मिळतात, आणि चांगला जोडीदार आकर्षित होऊन आपल्या पर्यंत पोहचतो.

आपले घर वास्तूच्या नियमांनुसार वायव्य, उत्तर आणि पूर्व विभाग संतुलित आणि उर्जावान करा.

वायव्य विभाग खरा जीवनसाथी आकर्षित करतो.

उत्तर विभाग विवाहाशी संबंधित नवीन संधी उत्पन्न करतो

पूर्व विभाग सामाजिक संपर्क वाढवितो.

या दिशा आणि विभाग संतुलित आणि उर्जावान करण्यासाठी या दिशेतील धातू आणि क्रिस्टल वापरा. वायव्य आणि उत्तर विभाग यासाठी निळा रंग आणि पूर्व झोन हिरवा रंग वापरा.

नातेसंबंध

वास्तुशास्त्र विवाहित जोडप्याच्या सुखी नात्यास मदत करते.

वास्तुशास्त्रानुसार शयनकक्ष नेहमीच नैऋत्य किंवा दक्षिण दिशेला असावे. पलंग धातूचा असू नये, सकारात्मक कंपने मिळविण्यासाठी लाकडी पलंग वापरा. तसेच ते आयताकृती किंवा चौरस आकाराचे असावेत. दाम्पत्याने झोपताना नेहमी दक्षिणेकडे डोके ठेवावे त्यामुळे नैसर्गिक रित्या आपल्या शरीरात रक्ताचे वहन चांगल्या प्रकारे होते. पत्नीने नेहमी पलंगाच्या डाव्या बाजूस झोपले पाहिजे आणि पती उजव्या बाजूस असावे जेणेकरून हे नातेसंबंध चांगले राहते.

बेडरूममध्ये संतुलन राखण्यासाठी क्रिस्टल्स आणि रंग वापरा, दक्षिण बेडरूममध्ये हलका गुलाबी रंग आणि नैऋत्य बेडरूममध्ये सोनेरी पिवळा रंग वापरा. आपण झोपत असताना आपल्या डोक्यावर तुळई किंवा उंचवटा असू नये. नैऋत्य बेडरूममध्ये नैऋत्य दिशेला जोडप्याच्या लग्नाचा फोटो लावावा.

तुमच्या वास्तूसाठी वैयक्तिक मार्गदर्शन हवे आहे?

विना तोडफोड उपायांसाठी प्राथमिक माहिती WhatsApp वर पाठवा.

WhatsApp वर सल्ला घ्या