शिक्षण आणि करिअर
शिक्षण आणि करिअरसाठी - वास्तुशास्त्र समाधान

शिक्षण
आपल्या घरात अभ्यासासाठी सर्वोत्तम बसण्याची जागा म्हणजे पश्चिम आणि नैऋत्य यामधील विभागात आहे. त्या झोनमध्ये “सुग्रीव्ह” आणि “दैवारीक” हे दोन देवता वास्तु पदमंडला नुसार उपस्थित आहेत. आपण अभ्यास करत असताना आपल्या डोक्यावर तुळई किंवा उंचवटा असू नये. अभ्यास करणार्या व्यक्तीने उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसावे. अभ्यासाच्या जागेच्या आसपासचा रंग पांढरा किंवा पिवळा असावा.
अभ्यासाच्या टेबलावर सरस्वती यंत्रासह पिरॅमिड असणे खूप चांगले आणि फायदेशीर आहे. सर्वोत्तम परिणामासाठी पिवळा रंगाचे स्वस्तिक किंवा सिट्रीन क्रिस्टल स्वस्तिक किंवा पितळी स्वस्तिक ठेवा.
अभ्यासाच्या रूमसाठी दुसरा पर्याय म्हणजे ईशान्य आणि आग्नेय विभाग.
करिअर
यशस्वी कारकीर्दीसाठी वास्तुशास्त्राने आपल्या जीवनात खूप महत्वाची भूमिका निभावली आहे, त्यासाठी आपल्या घरातील उत्तर विभाग अगदी स्वच्छ आणि संतुलित ठेवा. नवीन करिअर कल्पनांसाठी आग्नेय आणि पूर्व क्षेत्रास संतुलित करा. उत्तर विभाग आपल्या जीवनात नवीन संधी निर्माण करतो. उत्तर झोनसाठी आकाशी हा सर्वोत्कृष्ट रंग आणि आग्नेय झोनसाठी हिरवा रंग आहे.
करियरच्या नवीन संधीसाठी उत्तर भिंतीवर हिरवीगार पालवी असलेली झाडे आणि धबधबे असणारे चित्र लावा. कुबेर यंत्रासह ग्रीन जेड क्रिस्टल पिरामिड असणे खूप चांगले आणि फायदेशीर आहे. नवीन करिअर आणि नवीन कल्पनांसाठी पूर्व-आग्नेय भागात दोन ससे असलेला फोटो किवा दही घुसळण्याचे चित्र लावा.
तुमच्या वास्तूसाठी वैयक्तिक मार्गदर्शन हवे आहे?
विना तोडफोड उपायांसाठी प्राथमिक माहिती WhatsApp वर पाठवा.
WhatsApp वर सल्ला घ्या