॥ शुभ वास्तु • समृद्ध जीवन • मंगल दिशा ॥
वास्तुशास्त्र समाधान

आनंदी जीवन आणि यश

आनंदी जीवन आणि यश - वास्तुशास्त्र समाधान

आनंदी जीवन आणि यश

वास्तुशास्त्र हे दिशांचे विज्ञान आहे जे निसर्गाच्या पाचही तत्वांना (पंचमहाभूताना) एकत्र करते आणि ते मनुष्यासह वस्तूंनाही संतुलित करते.

वास्तुशास्त्र हे विज्ञान, कला, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांना एकरूप करते, त्याचबरोबर वास्तुशास्त्र हे वास्तुकला आणि बांधकाम यासाठी प्राचीन काळापासून एक रहस्यमय विज्ञान म्हणून देखील ओळखले जाते. वास्तुशास्त्र आपले जीवन चांगले बनविण्यास मदत करते आणि चुकीच्या गोष्टींपासून आपल्याला सुरक्षित ठेवत असते.

वास्तुशास्त्र हे वास्तुकला व बांधकाम यांचे शास्त्र आहे. हे या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक घटकाचे कंप आणि ऊर्जा यांचे विज्ञान आहे. आज वास्तुशास्त्र ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी कोणत्याही बांधकाम क्षेत्र किंवा स्थापत्य क्षेत्रातील कामे सुरू करण्यापूर्वी वापरले जाते.

वास्तुशास्त्रात पंच महाभूत म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाच मूलभूत घटकांचा विचार केला जातो ज्यामध्ये खलील तत्वांचा समावेश आहे

पृथ्वी – पृथ्वीतत्व

पाणी – जलतत्व

हवा – वायूतत्व

आग – अग्नीतत्व

आकाश – आकाशतत्व

प्रत्येक घटकाची स्वतःची एक विशिष्ट उर्जा असते आणि ती ही ऊर्जा त्याच्या विशिष्ट कंपंनांमुळे तयार होते. ही उर्जा सकारात्मक असू शकते किंवा ती नकारात्मक असू शकते. वास्तुशास्त्र येथे एका पुलाचे कार्य करते ज्यामुळे आपल्या जीवनात सर्व सकारात्मक उर्जा येण्याचा मार्ग तयार होतात.

वास्तुशास्त्रातील नियम समजून घेणे आणि वास्तूची रचना करतांना प्रत्येक विभागाचे योग्य संरेखन करुन त्यानुसार ऊर्जा निर्माण करणे हे महत्वाचे असते, त्यानुसार वास्तुशास्त्र हे वैश्विक शक्तींशी सुसंवाद साधून जीवन जगण्यास सुखद व आल्हाददायक बनवते.

आम्ही वास्तुशास्त्रानुसार वास्तूचे योग्य नियोजन आणि डिझायनिंग देखील करीत आहोत ज्यात सर्व प्रकारच्या निवासी तसेच व्यावसायिक प्रकल्पांचा समावेश आहे.

पहिल्या वास्तु भेटीत आम्ही वास्तू अराखडयवार काम करून, ई-स्कॅनर वापरुन जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजेच जमीनिखालील ऊर्जा तपासतो.

छापील अहवाल पूर्ण झाल्यानंतर आम्ही आपल्या वास्तूमधील उर्जा आणि कंपनांवर चर्चा करून, वास्तुशास्त्रानुसार विविध विभाग / खोल्यांचे सर्वोत्तम स्थान सुचवितो. आम्ही आपल्या ठिकाणच्या सकारात्मक उर्जासाठी रंग, आकार आणि वस्तूंचा वापर सुचवितो जेणेकरून आपल्याला अधिक समृद्धी, विकास, सुसंवाद आणि शांती मिळविण्यात मदत होते.

त्यानंतर शेवटी कोणत्याही संरचनात्मक बदलांशिवाय म्हणजेच विना तोडफोड, वास्तू-दोष निवारण करण्याचे उपाय सुचवितो.

तुमच्या वास्तूसाठी वैयक्तिक मार्गदर्शन हवे आहे?

विना तोडफोड उपायांसाठी प्राथमिक माहिती WhatsApp वर पाठवा.

WhatsApp वर सल्ला घ्या