वास्तुशास्त्र सल्लागार
“वास्तु मंगल असोसिएटेस” ही एक आघाडीची वास्तु सल्लागार संस्था आहे जी वास्तुशास्त्रात दिवसेंदिवस नवीन संशोधन, अभ्यास आणि सराव करीत आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वास्तुदोषांवर उपाय योजना, तेही विना तोडफोड करता रत्न / धातू / रंग / क्रिस्टल / यंत्र / पिरॅमिड यांचा वापर करून, चांगले आरोग्य, धनसंपत्ती, आनंदी जीवन, नातेसंबंध, नोकरी आणि व्यवसायातील प्रगति आणि यश यात खात्रीशीर सकारात्मक बदल घडवून आणण्यास समर्थ आणि सक्षम आहे.
याच बरोबर वास्तुमंगल हे ज्योतिष, लोलकशास्त्र, अंकशास्त्र, हस्तरेषा, क्रिस्टल हीलिंग, रेकी, अर्थ एनर्जी या क्षेत्रातही काम करत आहेत.
वास्तुशास्त्र हे दिशांचे विज्ञान आहे जे निसर्गाच्या पाचही तत्वांना (पंचमहाभूताना) एकत्र करते आणि ते मनुष्यासह वस्तूंनाही संतुलित करते.
वास्तुशास्त्र हे विज्ञान, कला, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांना एकरूप करते. वास्तुशास्त्र हे वास्तुकला आणि बांधकाम यासाठी प्राचीन काळापासून एक रहस्यमय विज्ञान म्हणून देखील ओळखले जाते.
वास्तुशास्त्र हे वास्तुकला व बांधकाम यांचे शास्त्र आहे. हे या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक घटकाचे कंप आणि ऊर्जा यांचे विज्ञान आहे.
पंचमहाभूत आणि वास्तु ऊर्जा
वास्तुशास्त्रात पंच महाभूत म्हणून ओळखल्या जाणार्या पाच मूलभूत घटकांचा विचार केला जातो ज्यामध्ये खालील तत्वांचा समावेश आहे.
प्रत्येक घटकाची स्वतःची एक विशिष्ट उर्जा असते आणि ती ही ऊर्जा त्याच्या विशिष्ट कंपनांमुळे तयार होते. ही उर्जा सकारात्मक असू शकते किंवा नकारात्मक असू शकते. वास्तुशास्त्र येथे एका पुलाचे कार्य करते ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक उर्जा येण्याचा मार्ग तयार होतो.
वास्तुशास्त्रातील नियम समजून घेणे आणि वास्तूची रचना करतांना प्रत्येक विभागाचे योग्य संरेखन करुन त्यानुसार ऊर्जा निर्माण करणे महत्वाचे असते. त्यानुसार वास्तुशास्त्र हे वैश्विक शक्तींशी सुसंवाद साधून जीवन जगण्यास सुखद व आल्हाददायक बनवते.
कोणत्या वास्तूसाठी सेवा?
वास्तुशास्त्र सेवा
सर्व प्रकारच्या राहण्यासाठी व व्यवसायिक वास्तूंसाठी मार्गदर्शन.
नवीन घर / फ्लॅट / प्लॉट / मोकळी जागा निवडण्यासाठी सल्ला.
नवीन बांधकामाचे प्लॅनिंग आणि डिझायनिंग.
जिओपथिक स्ट्रेस म्हणजेच जमिनी खालचे दोष शोधणे व उपाय योजना करणे.
सर्व प्रकारच्या वास्तुदोषांवर उपाय योजना, तेही विना तोडफोड.
सर्व प्रकारच्या वास्तूंचे वास्तुशास्त्रानुसार नूतनीकरण.
रत्न / धातू / रंग / क्रिस्टल / यंत्र / पिरॅमिड यांद्वारे उपाय योजना.