वास्तु मंगल
“वास्तु मंगल असोसिएटेस” ही एक आघाडीची वास्तु सल्लागार संस्था आहे जी वास्तुशास्त्रात दिवसेंदिवस नवीन संशोधन, अभ्यास आणि सराव करीत आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वास्तुदोषांवर उपाय योजना, तेही विना तोडफोड करता रत्न / धातू / रंग / क्रिस्टल / यंत्र / पिरॅमिड यांचा वापर करून, चांगले आरोग्य, धनसंपत्ती, आनंदी जीवन, नातेसंबंध, नोकरी आणि व्यवसायातील प्रगति आणि यश यात खात्रीशीर सकारात्मक बदल घडवून आणण्यास समर्थ आणि सक्षम आहे.
याच बरोबर वास्तुमंगल हे ज्योतिष, लोलकशास्त्र, अंकशास्त्र, हस्तरेषा, क्रिस्टल हीलिंग, रेकी, अर्थ एनर्जी या क्षेत्रातही काम करत आहेत.
वास्तुशास्त्र हे दिशांचे विज्ञान आहे जे निसर्गाच्या पाचही तत्वांना (पंचमहाभूताना) एकत्र करते आणि ते मनुष्यासह वस्तूंनाही संतुलित करते.
वास्तुशास्त्र हे विज्ञान, कला, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांना एकरूप करते, त्याचबरोबर वास्तुशास्त्र हे वास्तुकला आणि बांधकाम यासाठी प्राचीन काळापासून एक रहस्यमय विज्ञान म्हणून देखील ओळखले जाते. वास्तुशास्त्र आपले जीवन चांगले बनविण्यास मदत करते आणि चुकीच्या गोष्टींपासून आपल्याला सुरक्षित ठेवत असते.
वास्तुशास्त्र हे वास्तुकला व बांधकाम यांचे शास्त्र आहे. हे या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक घटकाचे कंप आणि ऊर्जा यांचे विज्ञान आहे. आज वास्तुशास्त्र ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी कोणत्याही बांधकाम क्षेत्र किंवा स्थापत्य क्षेत्रातील कामे सुरू करण्यापूर्वी वापरले जाते.

वास्तु क्लासेस

वास्तु परीक्षण

वास्तु कार्यक्रम

वास्तु पुरस्कार
उपाय आणि समाधान
वास्तुशास्त्र सेवा
- सर्व प्रकारच्या राहण्यासाठी व व्यवसायिक वास्तूंसाठी
- नवीन घर / फ्लॅट / प्लॉट / मोकळी जागा निवडण्यासाठी
- नवीन बांधकामाचे प्लॅनिंग आणि डिझायनिंग
- जिओपथिक स्ट्रेस म्हणजेच जमिनी खालचे दोष शोधणे व उपाय योजना करणे
- सर्व प्रकारच्या वास्तुदोषांवर उपाय योजना, तेही विना तोडफोड
- सर्व प्रकारच्या वास्तूंचे वास्तुशास्त्रानुसार नूतनीकरण
- सर्व प्रकारच्या उपाय योजना ( रत्न / धातू / रंग / क्रिस्टल / यंत्र / पिरॅमिड )















